24.6c

Max : 28.8c

Min : 22.2c

Rainfall : 5.8mm

Wind Speed : 2900mph

Humidity : 89%

Weather Forecast : Cloudy and Possibility of Precipitation

W
E
A
T
H
E
R

  • 02550 266062
  • enquires@lasalgaoncollege.com
  • NACC Re-accredited 'A' Grade
  • Best College Award, SPPU, Pune
  • First Prize At Jaagar Jaanivancha
  • ISO 9001:2015 & ISO 14001:2015

Option Form for Final Year Students

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत अंतिम सत्र/ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध
 

To fill option form - click here


रविवार १३ सप्टेंबर २०२० पर्यंत विकल्प अर्ज भरण्याची मुदत 

पुणे, दिनांक ९ सप्टेंबर २०२० : 
  अंतिम सत्र/वर्षातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन पध्द्तीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन पध्द्तीने सुद्धा परीक्षा देता येईल. याबाबत पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डी वरून विकल्प अर्ज (option form) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विकल्प अर्ज भरण्याची मुदत रविवार १३ सप्टेंबर २०२० पर्यंत आहे. 
  
मा. सर्वोच्च  न्यायालयाने दिनांक २८ ऑगस्ट, २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार,  मा. कुलपती तथा राज्यपाल यांच्या व महाराष्ट्र शासनाने दिनांक ०३ सप्टेंबर, २०२० रोजी सूचित केल्याप्रमाणे अंतिम सत्राच्या/अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांच्या नियमित व अनुशेषांतर्गत लेखी परीक्षा, तसेच प्रात्यक्षित/मौखिक/प्रकल्प/चर्चासत्रे (Seminar) या परीक्षांच्या आयोजनाबाबत अधिकार मंडळांनी मान्यता दिलेली असून, त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम सत्राच्या/अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. 

     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशभरातील व परदेशातील नावलौकिक व प्रतिष्ठा लक्षात घेऊन या विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी इतर राज्यातील तसेच परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. सध्या कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता अंतिम सत्रातील/अंतिम वर्षातील परीक्षांसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाने Online पध्दतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लाँगिन आयडीवरुन विकल्प अर्ज (Option Form) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. या बाबतीत काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा परीक्षा अधिकारी/विषय शिक्षक यांचेशी संपर्क साधावा.

 तरी अंतिम सत्र/अंतिम वर्षातील परीक्षांसाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या Online पध्दतीने परीक्षा देण्याचा अवलंब करुन परीक्षा द्यावी.

परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज विद्यार्थ्यांना पुढील लिंकवर उपलब्ध होईल : 
http://sps.unipune.ac.in/
------------------------------------------------
अंतिम सत्र/वर्षातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन पध्द्तीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन पध्द्तीने सुद्धा परीक्षा देता येईल. याबाबत पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडी वरून विकल्प अर्ज (option form) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता धोक्यात न घालता पालकांच्या सहकार्याने त्यांनी विकल्प अर्ज भरावा. विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या Online पध्दतीने परीक्षा देण्याचा अवलंब करुन परीक्षा द्यावी. 

- महेश काकडे,
संचालक, 
परीक्षा व मूल्यमापन मंडळ, 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-------------------------

Download