29.4c

Max : 37.5c

Min : 24.4c

Rainfall : 0mm

Wind Speed : 5200mph

Humidity : 57%

Weather Forecast : Mostly Cloudy

W
E
A
T
H
E
R

  • 02550 266062/+91 9822722814
  • enquires@lasalgaoncollege.com
  • NACC Re-accredited 'A' Grade with 3.30 CGPA
  • Best College Award, SPPU, Pune
  • First Prize At Jaagar Jaanivancha
  • ISO 9001:2015 & ISO 14001:2015
  • NEP Enabled
  • ICT Enabled

Har Ghar Tiranga

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्त 'आजादी का अमृत महोत्सव' अर्थात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत देशभरात 'हर घर तिरंगा' उपक्रम व 'स्वराज्य महोत्सव' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दिनांक ६ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रध्वजांच्या साहाय्याने जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक यांच्या सहभागातून विशिष्ट अॅपद्वारे सुमारे १,५०,००० हातात ध्वज धरलेले फोटो अपलोड करून गिनिजद्वारे जागतिक विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न आहे. तरी आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आवाहन करून आपला फोटो अपलोड करावेत. 
    
महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व विदयार्थ्यांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी खालील लिंक वर फोटो अपलोड करताना सर्व सूचनांचे काटेकोर पणे पालन करुन अंमलबजावणी करणे/ काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपला नकार दर (रिजेक्शन रेट) हा पंधरा टक्के आहे तो शुन्य टक्क्यावर असणे अपेक्षित आहे. अपलोड केलेला एकही फोटो रिजेक्ट होणार नाही याची काळजी आपण सर्वानी घेतली पाहिजे त्यासाठी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.
१.    एका फोटोत एकच व्यक्ती असावी.
२.    राष्ट्रीय तिरंगा दोन्ही हातानी छातीसमोर पकडून फोटो काढावा. (सोबत नमुना जोडला आहे.)
४.    चेहऱ्यावर स्वच्छ प्रकाशझोत असावा.
५. उच्च गुणवत्ता/प्रतीचा फक्त एकच फोटो लिंक वर अपलोड करावा
६.    फोटो काढताना उभे राहिल्यावर मागे फक्त स्वच्छ भिंत अथवा पडदा असावा.
६.    एका व्यक्तीने वरील लिंकवर फक्त एकदाच ६ ते  ७ एमबी आकारमानाचा फोटो अपलोड करावा. 

कृपया हे करू नका 

1. एकापेक्षा जास्त व्यक्ती एका फोटोत असू नयेत 
2. तिरंगा सोबत सेल्फी फोटो काढू नयेत
3.  वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढू नयेत.
 4. बॅकग्राउंडला कुठलाच फोटो/ अक्षर/डाग असू नये.
 5. एकापेक्षा जास्त फोटो अपलोड करू नये 
6.फोटोचा आकारमान सात एमबी पेक्षा जास्त असू नये.
7. घरातील व्यक्तीचा/मित्राचा/ नातेवाईकाचा फोटो प्लेन भिंतीवरच काढावा व तो अपलोड करावा.

कृपया वरील सर्व बाबींचे काटेकोर पालन करून जास्तीत जास्त फोटो अपलोड करावे.

 आपला फोटो अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा -   LINK1      LINK2

 


       रा.से.यो.
 कार्यक्रम अधिकारी
लासलगाव महाविद्यालय